मआविवि अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
आठ टक्के लाभांशाची घोषणा
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील मआविवि अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 16 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. या बैठकीत पतसंस्थेने सभासदांना आठ टक्के लाभांशाची घोषणा केली.
पतसंस्थेचे अध्यक्ष दिपक दिलीप थेटे यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक पार पडली. या बैठकीत मागील आर्थिक वर्षाचा आढावा घेण्यात आला तसेच मार्च 2024 अखेर पर्यत पतसंस्थेचे 169 सभासद असुन एकुण वसुल भाग भांडवल तीन कोटी इतके असल्याचे त्यांनी सांगितले.
पतसंस्थेचे उपाध्यक्ष संतोष जढाळ यांनी सांगितले की, आजवर पतसंस्थेने सभासदांना चार कोटी रुपये इतक्या रकमेचे कर्ज वाटप केले आहे. पतसंस्थेस मार्च 2024 अखेर 29 लक्ष रुपये इतका निव्वळ नफा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
पतसंस्थेचे मानद सचिव सतिष डंबाळे यांनी सांगितले की, पतसंस्थेने सभासदांना आठ टक्के इतका लाभांश घोषित केला आहे. पतसंस्थेचे सन 2023-24 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण पूर्ण झााले असुन संस्थेस ’अ’ वर्ग दर्जा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत पतसंस्थेचे लेखापाल कृष्णा पाटेकर यांनी पतसंस्थेच्या आर्थिक कामकाजाविषयी अहवाल सादर केला.
या बैठकीस पतसंस्थेचे अध्यक्ष दिपक दिलीप थेटे यांच्यासह उपाध्यक्ष संतोष जढाळ, मानद सचिव सतिष डंबाळे, खजिनदार चंद्रशेखर दळवी, संचालक राजेंद्र शहाणे, वनिता शार्दुल, विजय बच्छाव, बंडू गरुड, कांचन आव्हाड, स्विकृत संचालक रत्नाकर काळे, घनःशाम कुलकर्णी, सल्लागार डॉ स्वप्नील तोरणे आदी मंडळातील सदस्य व पतसंस्थेचे सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.