मिल्लीया महाविद्यालयात भरत कला कार्यशाळा उत्साहात संपन्न
बीड : मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात गृहविज्ञान विभागाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी एक दिवसीय भरतकला (हॅण्ड एम्ब्रोईडरी) कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ शुभांगी झेंड, अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ सय्यद हनीफ, गृहविज्ञान प्रमुख तथा कार्यशाळेच्या संयोजिका डॉ शामल जाधव, डॉ सुवर्णा तालखेडकर, डॉ एम ए शेख यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ शामल जाधव यांनी केले त्यांनी सांगितले कार्यशाळेचा मुख्यउद्देश कौशल्य विकास व भरत कला संवर्धना बरोबरच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा आहे. प्रमुख अतिथी म्हणून डॉ शुभांगी झेंड यांनी विद्यार्थिनींना भरत कला चे मार्गदर्शन / प्रशिक्षण दिले. तसेच त्यांनी विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ सय्यद हनीफ यांनी सांगितले की विद्यार्थिनीच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी भरत कला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या कौशल्य गुणांना वाव देणे आवश्यक आहे. कार्यशाळेस 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुवर्णा तालखेडकर तर आभार डॉ एम ए शेख यांची व्यक्त केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य मोहम्मद इलयास फाजील यांचे मार्गदर्शन लाभले.