एमजीएम विद्यापीठाचे प्रा डॉ प्रविणकुमार शास्त्री यांनी मिळवले एआयमध्ये पेटेंट

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चचे प्रा डॉ प्रविणकुमार शास्त्री यांनी मॅनेजमेंट मधील ‘एआय बेस्ड एक्सपेन्स इस्टिमेशन डिव्हाईस’ या विषयावरील पेटेंट आपल्या नावावर नोंदवले आहे. भारत सरकारच्या पेटेंट कार्यालयाने डॉ शास्त्री यांना या पेटेंटचे प्रमाणपत्र दिले आहे.

प्रा डॉ प्रविणकुमार शास्त्री

या पेटेंटमुळे दैनंदिन जीवनातील खर्च विशेषत : स्टॉक मार्केटमध्ये होणाऱ्या खर्चाचे नियोजन या माध्यमातून करता येणार आहे. डॉ शास्त्री यांचे’लेंडिंग प्रॅक्टिसेस ऑफ को – ऑपरेटीव्ह बँक्स’ या विषयावरील पुस्तकही प्रकाशित झालेले आहे. या पेटेंटसाठी डॉ शास्त्री यांना त्यांचा संशोधक विद्यार्थी किशोर दळवे यांचे सहकार्य लाभले आहे.

Advertisement

हे पेटेंट मिळविल्याबद्दल प्रा डॉ शास्त्री यांचे विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, संचालक डॉ रणीत किशोर व सर्व संबंधितांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

एमजीएम विद्यापीठात विद्यादानाचे काम करीत असताना मी हे पेटेंट मिळवू शकलो, यासाठी मला एमजीएममधील सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असताना मी हे पेटेंट मिळवू शकलो, याचा मला मनापासून आनंद आहे.

: प्रा. डॉ.प्रविणकुमार शास्त्री 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page