शिवाजी विद्यापीठात ई-टेंडर प्रणालीतून साहित्य खरेदीबाबत कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ वित्त व लेखा विभागातर्फे ई-टेंडर प्रणालीतून साहित्य खरेदीबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेमध्ये ई-टेंडर प्रणालीतून साहित्य व उपकरणे खरेदी विषयक प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली.

Shivaji University, Kolhapur, suk

विनायक जाधव, ई-टेंडर नोडल ऑफिसर, सांगली जिल्हा परिषद हे प्रमुख वक्ते होते. त्यांनी ई-टेंडर प्रणालीतून होणारी खरेदी प्रक्रिया, अनुषंगिक शासन निर्णयातील तरतुदी, खरेदी प्रक्रियांमध्ये उद्भवणाऱ्या अडचणींबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Advertisement

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ व्ही शिंदे होते. त्यांनी प्रशासकीय कामकाज पारदर्शक व सुनियोजित होण्याकरिता शासन स्तरावर नवीन येणाऱ्या प्रणालींचा वापर करण्याचे महत्त्व विषद केले. वित्त व लेखा अधिकारी डॉ सुहासिनी पाटील यांनी साहित्य खरेदीबाबत प्रक्रिया घ्यावयाची काळजी व ई-टेंडर प्रणाली ची आवश्यकता सांगितली.

कार्यक्रमाला मुख्य लेखापाल दुर्गाली गायकवाड यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक कुलसचिव सुरेश बंडगर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page