अमरावती विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागात क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धां संपन्न
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने विविध क्रीडा स्पर्धांचे आय़ोजन करण्यात आले होते. मुलांसाठी व्हॉलिबॉल स्पर्धा, तर मुलींसाठी लगोरी स्पर्धा घेण्यात आल्यात. कुलसचिव डॉ अविनाश असनारे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अमरावतीचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
व्हॉलिबॉल स्पर्धेत एम बी ए, शारीरिक शिक्षण, होस्टल टीम, भौतिक शास्त्र, होम सायन्स, संगणकशास्त्राच्या संघाने भाग घेतला. यामध्ये होस्टेल संघ विजेता ठरला, तर शारीरिक शिक्षण संघ उपविजेता ठरला.
बक्षीस वितरण समारंभाला प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ हेमलता नांदुरकर, बायोटेक्नॉलॉजी विभागाचे डॉ प्रशांत शिंगवेकर उपस्थित होते.
याप्रसंगी कुलसचिव डॉ अविनाश असनारे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. क्रीडा दिवसाबाबत विभागाच्या प्रमुख डॉ तनुजा राऊत यांनी माहिती दिली. याप्रसंगी डॉ हेमंतराज कावरे, डॉ अतुल बिजवे, डॉ विजय निमकर, निलेश इंगोले, सौरभ त्रिपाठी, सविता बावनथडे उपस्थित होते. निशांत कुमार व आदेश राक्षे यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. संचालन कल्याणी संगुवेढे, पाहुण्यांचा परिचय व आभार सामा लीवा हिने मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील विविध विभागाचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.