श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये गीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न
परभणी : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये संगीत व सांस्कृतिक विभागाच्या वतीने गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ श्रीनिवास केशट्टी सर यांनी केले तर मंचावर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ प्रल्हाद भोपे संगीत विभाग प्रमुख प्रा सविता कोकाटे, परीक्षक प्रा ऋतुजा वनकर आदींची उपस्थिती होती.



उद्घाटन प्रसंगी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासेत्तर आणि अभ्यासपूरक विविध उपक्रमामध्ये सहभाग घेऊन आपले व्यक्तिमत्व विकसित केले पाहिजे असे सांगून स्पर्धक कलावंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची सांस्कृतिक, साहित्यिक परंपरा सांगून प्रेरित केले. स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद भोपे यांनी केले. या स्पर्धेमध्ये एकूण १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अभिरुपा पैंजणे, आरती महामुने, वैष्णवी गिरी, सायली शिंदे, श्रुतिका सोनटक्के, श्रेया कदम, कृष्णा लिंबेकर, संगम वाघमारे, गणेश राजगुरे, हर्षदा टेकुळे, कोमल जोंधळे, सावित्री तनकटे आदींनी सहभाग घेतला होता. भावगीते, भक्तिगीते, देशभक्तीपर गीते, चित्रपट गीते, भजने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सादर केली.
याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच प्रा अंकुश पाटील प्रा कृष्ण शिनगारे, प्रा अमोल गवई, प्रा रवी सोनवणे, प्रा पासंगे सारिका उपस्थित होते. सय्यद सादिक, सुरेश पेदापल्ली यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.