नागपूर विद्यापीठाच्या पर्यटन विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी लघु शैक्षणिक सहलीचे आयोजन संपन्न
प्रवास व पर्यटन विभागात लघु शैक्षणिक सहल
विद्यापीठ प्रवास व पर्यटन विभागाचे आयोजन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रवास व पर्यटन विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी लघु शैक्षणिक सहलीचे आयोजन बुधवार, दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आले.
या सहलीत बोर येथील व्याघ्र प्रकल्प, विपश्यना केंद्र, एमटीडीसी रिझोर्ट, पवनार येथील विनोबा भावे आश्रम व पवनारचा किल्ला तसेच महात्मा गांधी आश्रम सेवाग्राम आणि विश्वशांती स्तूप वर्धा या विदर्भातील प्रेक्षणीय आणि वारसा स्थळांना भेट देण्यात आली.
या शैक्षणिक सहलीद्वारे टुरिझमच्या विद्यार्थ्यांनी एक दिवसीय सहलीचे नियोजन स्वतः केले. हे करत असताना टूर मॅप बनविणे, बस शोधने, प्रवास खर्च काढणे, प्रेक्षणीय स्थळांची माहिती सांगणे असे विविध कार्य केले. हा त्यांच्या अभ्यासक्रमाच्या भाग असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना एक यशस्वी टूर मॅनेजर बनण्यास मदत मिळेल. लघु शैक्षणिक सहल यशस्वी करण्याकरिता पदवी भाग १ आणि भाग २ च्या विद्यार्थ्यांनी योगदान दिले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता विभाग प्रमुख डॉ प्रियदर्शि खोब्रागडे, डॉ अरविंद उपासनी आणि प्रा शोभना मेश्राम, प्रा मनोज वहाने यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.