रायसोनी महाविद्यालयाचे विद्यार्थी अर्पीत, देवेश आणि साहिल यांची इस्त्रो मध्ये इंटर्नशिपसाठी निवड
पुणे : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) तर्फे आयआयटी आणि एनआयटीसह भारतातील प्रमुख अभियांत्रिकी संस्थांच्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतरीक्ष हॅकाथॉन 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विद्याशाखेतील तृतीय वर्षाचे विद्यार्थी अर्पीत चांदणे, देवेश म्हस्के आणि साहिल निचट अंतिम फेरी गाठली होती. यामुळे या वरील विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे इंटर्नशिपसाठी निवड झाल्याची माहिती रायसोनी कॉलेज पुणेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ आर डी खराडकर यांनी दिली.
डॉ आर डी खराडकर म्हणाले, की भारतीय अंतरीक्ष हॅकाथॉन हा 30 तासांचा कार्यक्रम इस्रोने आयोजित केला होता; आणि प्रथमच राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आले होते. आयआयटी आणि एनआयटीसह भारतातील प्रमुख अभियांत्रिकी संस्थांतील 3,062 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. नुकत्याच हैदराबादच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये केवळ शीर्ष ३० संघांनीच अंतिम फेरीत स्थान मिळवले.
भारतीय अंतरीक्ष हॅकाथॉन 2024 ने अंतराळ तंत्रज्ञानातील जटिल आव्हानांचा सामना करण्यासाठी आमचे विद्यार्थी अर्पीत, देवेश आणि साहिल सहभागीं झाले होते. त्यांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण उपायांनी आणि तांत्रिक कौशल्याने न्यायाधीशांना प्रभावित केले. या स्पर्धेतील त्यांच्या यशामुळे त्यांची इस्त्रो येथे इंटर्नशिपसाठी निवड झाली, जिथे त्यांना देशाच्या काही सर्वोच्च शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांसोबत अत्याधुनिक अवकाश संशोधन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल.
या यशाबद्दल रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष सुनील रायसोनी, रायसोनी एज्युकेशनचे कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन