डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करणार १६३ खेळाडूंचा गुणगौरव
क्रीडा संचालकांची मंगळवारी वार्षिक नियोजन बैठक
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ क्रीडा विभाग यांच्यावतीने येत्या मंगळवारी (दि २७) वार्षिक बैठक व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप यांनी दिली. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार जिल्हातील (छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव) संलग्नीत महाविद्यालयातील खेळाडू व क्रीडा प्राध्यापक, क्रीडा संचालकांसाठी वार्षिक स्पर्धा. नियोजन यासंदर्भात बैठक व कार्यशाळा होणार आहे. विद्यापीठ नाट्यगृहात सकाळी ०९:३० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत करण्यात आले आहे.डॉ संदीप जगताप, छत्रपती संभाजीनगर, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, खेलो इंडिया, कुलगुरू डॉ विजय फुलारी, धावपट्टू भाग्यश्री बिले, खेळ कट्टा,
सदरील कार्यक्रमामध्ये शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ मध्ये पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ, आखिल भारतीय आंतरविद्यापीठ, खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा, जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा व क्रीडा महोत्सवातील गुणवंत विजयी खेळाडूंना रोख रक्कम, व ब्लेझर देवून गौरविण्यात येणार असुन, सदरील कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय पदक विजेती, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त धावपट्टू भाग्यश्री बिले यांना निमंत्रीत केले आहे.
सदरील कार्यक्रमासाठी कुलगुरू डॉ विजय फुलारी, प्र-कुलगुरू डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, प्रभारी क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप आदींसह क्रीडा मंडळ व अभ्यास मंडळ सदस्य उपस्थीत राहणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ मध्ये उल्लेखनिय कामगीरी करणाऱ्या महाविद्यालयांना “उकृष्ठ क्रीडा महाविद्यालय सन्मान” व मागील वर्षी सेवानिवृत्त झालेल्या क्रीडा संचालकांचाही सेवागौरव कुलगुरू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दुपारच्या सत्रामध्ये ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये क्रीडा प्राध्यपकांची भुमिका’ या विषयावर डॉ शत्रुंजय कोटे, ‘प्रथमोपचार आणि सी पी आर प्रशिक्षण डॉ राहुल जाधव, आंतरविद्यापीठ नियमावली अभिजीतसिंग दिख्खत आदी आपले विषय मांडणार आहेत.
तसेच विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमध्ये नव्याने आयोजीत होणाऱ्या ११ खेळासाठीचे नियम व नियमावली तंज्ञ विविध खेळाचे राज्य व जिल्हा सचिव मांडणार आहेत.
सदरील कार्यक्रमासाठी गेल्या वर्षभरात नावलौकीक मिळविलेल्या खेळाडूंना करण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी क्रीडा संचालकांनी उपस्थीत रहावे,असे आवाहन प्र-क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप यांनी केले आहे.