डॉ जे जे मगदूम फार्मसी कॉलेज महाविद्यालयाचा अंतिम वर्षाचा १०० % निकाल
जयसिंगपूर : डॉ जे जे मगदूम ट्रस्ट चे डॉ जे जे मगदूम फार्मसी कॉलेज च्या शैक्षणिक वर्ष 2023- 24 औषध निर्माणशास्त्र अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून उज्वल यशाबरोबरच शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवून औषध निर्माणशास्त्र क्षेत्रात बाजी मारली आहे.
यंदाच्या अंतिम वर्षातील परीक्षेत डॉ जे जे मगदूम फार्मसी कॉलेज, जयसिंगपूर येथून एकूण 112 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यातून आशिष कुमार धूत्रे याने 9.09 एसजीपीए गुण प्राप्त करून अव्वल स्थान पटकावले तर सृष्टी राजगोंडा पाटील हिने 8.91 एसजीपीए संपादन करून द्वितीय क्रमांक मिळवला असून ईतर सर्व विद्यार्थी अतिशय उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. कॉलेजचे प्राचार्य डॉ शितलकुमार एस पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल अभिमान आणि समाधान व्यक्त केले. “हे यश विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या कष्टाचे वचनबद्धतेचे प्रतीक आहे. आमच्या सर्वसमावेशक शैक्षणिक दृष्टिकोनाने आणि समर्थ वातावरणाने या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे,” असे प्रतिपादन केले. या परीक्षेसाठी डॉ जे जे मगदूम फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ शितलकुमार पाटील, शैक्षणिक समन्वयक डॉ सतीश किलजे व सर्व प्राध्यापकांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
तसेच डॉ जे जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदूम, व व्हाईस -चेअर पर्सन अॅड डॉ सोनाली मगदूम यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ विजय मगदूम यांनी सांगितले की या विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे हे यश साध्य झाले असून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे नाव आणखी उज्ज्वल केले आहे. तसेच ही यशाची वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहील असे प्रतिपादन केले.