सौ के एस के महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन साजरा

बीड : नवगण शिक्षण संस्थेचे सौै केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी स्व पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त व अक्षय ऊर्जा दिना निमित्त अवरनेस ऑफ एनर्जी  कॉन्सर्वेशन अँड डेव्हलपमेंट इन इंडिया या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

व्याख्याते म्हणून अतुल मुळे विज्ञान शिक्षक जिल्हा परिषद माध्यमिक शाळा खोकरमोहा ता शिरूर कासार जि बीड हे लाभले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अक्षय उर्जेचे महत्व समजावून सांगितले.रिनीवेबल एनर्जी स्त्रोत याची सविस्तर माहिती दिली. तसेच सौरउर्जा, पवन उर्जा, भूऔष्णिक उर्जा व समुद्राच्या लाटा पासून उर्जा निर्मिती याची माहिती दिली. त्यांचे उपयोग व भारताचे जगातील स्थान या विषयी अभ्यासपूर्ण व मनोरंजक पध्दतीने विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.

Advertisement

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांनी अक्षय उर्जेचे दैनंदिन जीवनातील महत्व विषद केले. नवगण शिक्षण संस्था राजुरीच्या उपाध्यक्ष डॉ दीपाताई क्षीरसागर यांच्या प्रेरणेतून व संस्थेचे पदाधिकारी डॉ सुधाकर गुट्टे, डॉ विश्वांभर देशमाने तसेच डॉ संजय पाटील देवळाणकर यांच्या मार्गदर्शनातून हे व्याख्यान संपन्न झाले.

या प्रसंगी पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ ए एस खान, उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, शिक्षक प्रतिनिधी डॉ बळीराम राख हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ प्रज्ञा महेशमाळकर यांनी केले. तर आभार डॉ अशोक डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुळे मॅडम, अभिषेक अंबेकर, प्रा शिवाजी राऊत, प्रा अनिल जाधव, प्रा गोंडे, प्रा काझी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page