महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना निषेधार्ह, कठोर कार्यवाहीची अभाविपची मागणी
महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी आणि कठोर पावले उचलली पाहिजेत
पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मणिपूर आणि पश्चिम बंगालमधील महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा तीव्र निषेध करते. या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्यात यावी आणि मणिपूरमधील हिंसक परिस्थिती सामान्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जावेत. सध्या राजस्थान, पश्चिम बंगाल, झारखंड आदी विविध राज्यांमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना अत्यंत लज्जास्पद आहेत.महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कठोर आणि प्रभावी पावले उचलली पाहिजेत.
“मणिपूर आणि पश्चिम बंगालमधील हिंसाचार तसेच महिलांवरील गुन्हे व लैंगिक अत्याचाराच्या घटना अत्यंत निंदनीय आणि चिंताजनक आहेत. सुसंस्कृत राष्ट्र आणि समाजात हिंसा आणि गुन्हेगारीला कोणतेही स्थान नाही. राजस्थानमधून महिलांवरील अत्याचार, गँगरेप यांसारख्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशा प्रकरणांमध्ये कोणतेही राजकारण न करता कठोर कारवाई झाली पाहिजे आणि दोषींना कडक शिक्षा व्हायला हवी.
Advertisement– कु. अंकिता पवार , ( राष्ट्रीय सचिव , अखिल भारतीय विद्यार्थी परिषद )
अभाविप चे राष्ट्रीय महामंत्री श्री याज्ञवल्क्य शुक्ल म्हणाले की, “अलीकडेच मणिपूर, पश्चिम बंगाल, राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये ज्या पद्धतीने महिलांवरील अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडल्या, त्या अत्यंत लाजिरवाण्या आणि चिंताजनक आहेत. अशा प्रकरणांमध्ये सरकारने कडक कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद समाजाला आवाहन करते की, गुन्हेगारी आणि हिंसाचार रोखण्यासाठी समाजाच्या स्तरावर प्रभावी पावले उचलण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली महत्त्वाची भूमिका बजावत पुढे यावे. लैंगिक गैरवर्तनाची प्रकरणे निंदनीय, सरकारने कठोर कारवाई करावी : अभाविप