विवेकानंद महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्यदिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
छत्रपती संभाजीनगर : विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दादाराव शेंगुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात पार पडले. संगीत विभागाने बहारदार गीते सादर केली.
याप्रसंगी NDA मध्ये ऑल इंडिया रँक दोन आलेला आदित्य गोरख बाविस्कर या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ११ वी कला शाखेतील मोहित जसवंतसिंग राजपूत या विद्यार्थ्याने 27 जुलै 2024 ला झालेल्या थाय बॉक्सिंग (Thai Boxing) राज्यस्तरीय स्पर्धेत विविध गटात गोल्ड मेडल (Gold Medal) व सिल्व्हर मेडल प्राप्त केले. आजपर्यंत विविध स्पर्धेत सोळा मेडल्स त्याने पटकविलेले आहेत. त्याच्या या कामगिरीबद्दल स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दादाराव शेंगुळे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. तर 8 सप्टेंबर 2024 ते 16 सप्टेंबर 2024 दरम्यान पोर्तूगाल (युरोप) येथे होणाऱ्या वर्ड चॅम्पियनशीप साठी (जिम्नास्टिक) ऑल इंडिया मधून महाविद्यालयाची विद्यार्थींनी रिद्धी जैस्वाल हीची निवड झाली आहे. त्याबद्दल प्राचार्यांनी तिचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ टी आर पाटील, डॉ ए जी पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा प्रदीप पाटील, पर्यवेक्षक प्राध्यापक गणेश दळे, प्रा भारत सोनावणे, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.