गोंडवाना विद्यापीठात नवउद्योजकांकरीता पॅँकेजिंगवर आधारीत प्रशिक्षण कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
22 नवउद्योजकांनी नोदंविला सहभाग
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातंर्गत ट्राईबटेक समूह उद्योजकता प्रतिष्ठान – ट्रायसेफ नवसंशोधन केंद्रामध्ये नव उद्योजकांकरीता पॅकेजिंग आधारीत प्रशिक्षण कार्यशाळेचे 14 आॅगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजता आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षण कार्यशाळेस प्रविन पुसदेकर, महाव्यवस्थापक, सुरज लॉजिस्टिक प्रायवेट लिमिटेड, जमशेदपूर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते. ट्रायसेफ अंतर्गत नोदणी झालेले जवळपास 22 नवउद्योज़कांनी सहभाग नोदविला.
कार्यशाळेदरम्यान पुसदेकर यांनी नवउद्योजकांचे विविधांगी उत्पादने जसे वनउपज, पंचगाव्य, बांबू व रॉक डोकरा हस्तशिल्प, मशरुम, पर्यटन इत्यादीबाबत पॅकेजिंग संबधित विस्तारपणे सादरीकरणासह मार्गदर्शन केले. तत्पूर्वा विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे यांच्या हस्ते प्रमुख वक्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सदर कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाकरीता ट्रायसेफ कंद्राचे संचालक, प्रा मनिष द उत्तरवार यांनी अथक परिश्रम घेतले.