गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे भरीव योगदान व उल्लेखनीय कामगिरी

राष्ट्रीय सेवा योजनेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

गडचिरोली : उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सन 2022-23 या वर्षासाठी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केले आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने दिलेल्या भरीव योगदानाची आणि केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कारासाठी गोंडवाना विद्यापीठ संलग्न असलेल्या शरद पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, गडचांदूर (ता कोरपना) येथील विद्यार्थी डॉ शरद बापुराव बेलोरकर यांची निवड करण्यात आली.

Advertisement

सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार शरद पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, गडचांदूर (ता कोरपना) या महाविद्यालयास जाहिर करण्यात आला. तर सर्वोत्कृष्ठ स्वयंसेवक पुरस्कारासाठी केवळराम हरडे महाविद्यालय, चामोर्शी (जि गडचिरोली) महाविद्यालयाचा ‌विद्यार्थी अरबाज मुस्तफा शेख या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आहे. ही गोंडवाना विद्यापीठासाठी अभिमानाची बाब आहे. याकरीता राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ श्याम खंडारे यांनी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनात उत्कृष्ठ कार्य केल्याची ही पावती आहे.

सदर पुरस्कर्त्यांचा शासनामार्फत प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन यथोचित सत्कार केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page