शिवाजी विद्यापीठामधील भौतिकशास्त्र अधिविभात रक्तदान शिबिर संपन्न
रक्तदान करून राष्ट्रीय एकात्मता वाढवू – प्र-कुलगुरु प्रा डॉ पी एस पाटील
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान – प्रा डॉ आर जी सोनकवडे
कोल्हापूर : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आज रक्ताचा पुरवठा अपुरा आहे रक्तदान दिल्याने अनेक लोकांचे आपण प्राण वाचवू शकतो म्हणून या म्हणून रक्तदान करून राष्ट्रीय एकात्मता वाढवू असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ पी एस पाटील यांनी केले ते शिवाजी विद्यापीठामधील भौतिकशास्त्र अधिविभाग, आरोग्य केंद्र आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांचे संयुक्त विद्यमाने १६ ऑगस्ट रोजी भौतिकशास्त्र अधिविभागात रक्तदान शिबिराच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
सदरचे शिबिर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित केला गेला. भौतिकशास्त्र अधिविभाग हा शिक्षणाबरोबर सर्व सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा 13 हून अधिक जणांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले. भौतिकशास्त्र अधिविभागप्रमुख प्रा डॉ आर जी सोनकवडे, यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ एम व्ही टाकळे यांनी शिबिराचे संयोजन केले. सीपीआरच्या डॉ आनंद वडजे, रणजीत केसरे, सचिन सुतार, जयवंत कदम, दिव्या घडशी, मनाली घडशी, किरण देसाई, उत्तम पाटील, राहुल धनवडे, दामोदर कामत, अमन मुल्ला या वैद्यकीय पथकाने रक्तसंकलन केले.
रक्तदान केल्यानंतर चक्कर आल्यास किंवा आजारी पडल्यास अधिविभागामध्ये विश्रांतीसाठी खोलीची व्यवस्था केली होती. रक्तदानासाठी आलेल्या लोकांना चहा व अल्पोपहार देण्यात आले. रक्तदात्यांना छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांचेकडून प्रशस्तीपत्रक देण्यात आले. भौतिकशास्त्र अधिविभाग हा विद्यापीठातील शैक्षणिक व संशोधनामध्ये अग्रेसर अधिविभाग आहे. अधिविभागातील ‘भौतिकशास्त्र उपकरण सुविधा केंद्रातील’ (पीआयएफसी) अत्याधुनिक उपकरणांच्या सुविधेमुळे संशोधनासाठी नेहमीच पुढे आहे, त्यामुळे विद्यार्थी भौतिकशास्त्र अधिविभागाला पसंती देतात.
अधिविभागातून बाहेर पडलेले विद्यार्थी जगभरात संशोधन क्षेत्रात आघाडीवर आहेत. अधिविभागामध्ये विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. तसेच अधिविभागामध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले जाते. अधिविभागातील प्राध्यापकांचा संशोधनामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक आहे. रक्तदान संपन्न झाल्यानंतर अधिविभागप्रमुख प्रा प्रा डॉ आर जी सोनकवडे यांनी शिबिरात उपस्थित सर्वांचे आभार व कौतुक केले.
सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रा डॉ के वाय राजपुरे, डॉ ए व्ही मोहोळकर, डॉ आर एस व्हटकर, डॉ एन एल तरवाळ, डॉ एस पी दास, डॉ व्ही एस कुंभार, डॉ एम आर वाईकर, डॉ ए आर पाटील, डॉ एस एस पाटील आदिंनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शिवाजी विद्यापीठ प्रशासनाच्या पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळेच हे सर्व शक्य होत आहे असे भौतिकशास्त्र अधिविभागप्रमुख प्रा आर जी सोनकवडे यांनी सांगितले.