माजी कुलगुरू डॉ विजय पांढरीपांडे यांना IETE चा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२४ जाहीर
आपला कट्टा : अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा इन्स्टिट्युट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्यूनीकेशन इंजिनीअर्स नवी दिल्ली चा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२४, डॉ बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ विजय पांढरीपांडे यांना जाहीर झाला आहे. या संस्थेचे रामलाल वाधवा सुवर्ण पदक याआधी त्यांना मिळाले आहे. १४ सप्टेंबर रोजी IETE भोपाळ येथे आयोजित IETE परिसंवादाच्या सत्रात पुरस्कार प्रदान केले जाणार आहे.
IETE परिसंवादात माजी कुलगुरू डॉ विजय पांढरीपांडे यांच्या होमी भाभा स्मृती व्याख्यानाचे आयोजन केले आहे.
डॉ पांढरीपांडे यांचे १७० शोध निबंध विविध जर्नल्स मध्ये प्रसिध्द झाले आहेत. अनेक वैज्ञानिक, प्राध्यापक यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी चे संशोधन केले आहे. हे संशोधन डिफेन्स रडार प्रणाली विकसित करण्या संबंधित आहे. त्यांनी भारत सरकारच्या जागतिक ब्यानके च्या दोन प्रकल्पावर काम केले आहे. उस्मानिया विद्यापीठात त्यांनीच स्थापन केलेल्या संशोधन केंद्राचे ते मानद संचालक आहेत. यापूर्वी आंध्र प्रदेश सरकारने, तसेच उस्मानिया विद्यापीठाने त्यांना उत्तम शिक्षक म्हणून गौरविले आहे. माजी विद्यार्थ्यांनी देखील एक करोडची देणगी देऊन त्यांच्या नावे एक आधुनिक प्रयोग शाळा उभारली आहे.
जेव्हा प्रा पांढरीपांडे हे होमी भाभा स्मृती व्याख्यान देतील