यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या भांडार कक्षातर्फे रविवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी महाकवी कालिदास कलामंदिर येथे सकाळी १०:०० वाजल्यापासून विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित केली आहे.
इलाईट सर्टीफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोलूशन्स (नाशिक) यांच्यावतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या विचार जागर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे आयोजित केला आहे. महापुरुषांचे विचार आणि कार्याबाबत नव्या पिढीला माहिती करून देत असतानाच त्यांना राज्यसेवा परीक्षेची ओळख व्हावी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने सदर स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती.
मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. सदर पारितोषिक वितरण सोहळ्यास अंदाजे १५०० विद्यार्थी आणि पालक उपस्थित राहतील. तरी या पुस्तक प्रदर्शनाला विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भेट द्यावी असे आवाहन मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे संचालक नागार्जुन वाडेकर यांनी केले आहे.
—————————