सौ के एस के महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षक पालक मेळावा संपन्न
सौ के एस के महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधांचा विद्यार्थ्यांनी सर्वागिण विकासासाठी वापर करावा – मनिषा मोरे
बीड : नवगण शिक्षण संस्थेचे सौै केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये दि 14 ऑगस्ट 2024 रोजी विद्यार्थी शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सौ के एस के महाविद्यालयामध्ये शैक्षणिक सुविधा भरपूर आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे भावी आयुष्य घडविण्यासाठी या महाविद्यालयात सुसज्ज ग्रंथालय, भव्य क्रिडांगण, सर्वसोयीयुक्त वसतीगृह आणि उच्चविद्याविभूषित शिक्षकवृंद लाभलेला आहे. उद्याचा सक्षम व क्रियाशील नागरीक बनण्यासाठी या महाविद्यालयात पोषक वातावरण आहे. मनिषा मोरे पालक या नात्याने पुढे म्हणाल्या की, या महाविद्यालयाची मुहूर्तमेढ स्व खा केशरबाई क्षीरसागर यांनी रोवलेली आहे
काकूचा वारसा पुढे प्राचार्य डॉ दीपाताई क्षीरसागर या सक्षमपणे चालवत आहेत. आणि आता हाच आदर्श वारसा डॉ योगेश भैय्या क्षीरसागर व सारिकाताई क्षीरसागर ही आदर्श जोडी पुढे नेत आहे. मीही याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून आज चांगल्या पदावर कार्य करत आहे. म्हणून मी माझ्या मुलीचा प्रवेश आर्वजुन याच महाविद्यालयात घेतलेला आहे. विद्यार्थी, शिक्षक व पालक ही त्रिसूत्री फार महत्वाची आहे. विद्यार्थी घडण्यासाठी या तिनही घटकांना जागरूक आवश्यक आहे.
या प्रसंगी महाविद्यालया प्राचार्य डॉ क्षीरसागर म्हणाले की, महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये शिस्त फार महत्वाची असून आम्ही त्यांच्यावर बारकाईने लक्ष देत असतो. विद्यार्थी पालकांना शिक्षणासंबंधी काही अडचणी असल्यास त्यांनी प्रत्यक्षपणे आमच्याशी चर्चा केली पाहिजे. महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांसाठी जाणीव पूर्वक निर्माण केल्या गेलेल्या आहेत. एकविसाव्या शतकातील एकूण आव्हानांचा विचार करून महाविद्यालय शैक्षणिक सुविधांनी सज्ज आहे. विद्यार्थ्यांचे सर्वांगिण जडणघडण व्हावे हा आमचा मुख्य उद्देश आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थी विविध उच्च नामांकित पदावर पोहोचलेले आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक वृंद उच्च शिक्षीत व अनुभवी आहे. आम्ही आमच्या कडून विद्यार्थ्यांना सर्व विद्याशाखांचे ज्ञान देण्याचे कार्य अविरतपणे करत आहोत.यामध्ये पालकांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. पाल्यांची जडणघडण होत असताना पालकांनी महाविद्यालयाशी सलग्न राहणे अत्यंत आवश्यक आहे.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये उपप्राचार्य डॉ नारायण काकडे यांनी असे प्रतिपादन केले की, अकरावी व बारावीचा विद्यार्थी वादळा सारखा असतो. त्या वादळी शक्तीला सकारात्मक उर्जेमध्ये परिवर्तीत करणे आवश्यक आहे. म्हणून पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
या प्रसंगी विद्यार्थिनी शेळके, चौधरी तर विद्यार्थ्यांमध्ये सांगळे योगेश, हुंबे विजय, घोलप संग्राम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जोशी सोनाली जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, डॉ सुधाकर गुट्टे, डॉ विश्वांभर देशमाने, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ ए एस खान, कमवि उपप्राचार्य काकडे एन आर, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर आदीसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सौ मंजू जाधव व आभार प्रा उमाकांत जगताप यांनी मानले.