उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि हार्टफुलनेस एज्यूकेशन ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि हार्टफुलनेस एज्यूकेशन ट्रस्ट यांच्यात दि १२ ऑगस्ट २०२४ रोजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
हार्टफुलनेस एज्यूकेशन ट्रस्ट चे जागतिक मुख्यालय हैद्राबाद येथे असून १६० देशांमध्ये त्याचा विस्तार आहे. मानसिक ताणतणाव, व्यवस्थापनाच्या दृष्टीने एकाग्रता व स्मरणशक्ती संवर्धनाच्या हेतूने योगाभ्यास ध्यानाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या सामंजस्य करारामुळे विद्यापीठातील विविध प्रशाळेतील विद्यार्थी, कर्मचारी यांच्यातील मानसिक व अध्यात्मिक आरोग्य कार्यशाळा नि:शुल्क घेतल्या जातील. तसेच मानसिक शांतता, ध्यानधारणा, नैतिक मूल्यशिक्षण यांचे विविध कार्यक्रमही घेतल्या जाणार आहेत.
या सामंजस्य करारावर हस्ताक्षर करण्यासाठी हार्टफुलनेस एज्यूकेशन ट्रस्ट यांच्या वतीने विभाग समन्वयक मीनाक्षी पाटील, धुळे व वरिष्ठ ध्यान प्रशिक्षक, डॉ दिलीप नेहेते, जळगाव यांची उपस्थिती होती. यावेळी प्र- कुलगुरू प्रा एस टी इंगळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील, योगशास्त्र विभाग प्रमुख इंजि राजेश पाटील तसेच डॉ लीना चौधरी, प्रा गीतांजली भंगाळे यांची उपस्थिती होती.