शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या कौशल्यवाढीसाठी संगणक बनवण्याच्या उपक्रमास सुरवात

कोल्हापूर : संगणकाचे विद्यार्थ्यांसाठी असणारे महत्व ओळखून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ डि टी शिर्के सर यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्यवाढी साठी विद्यार्थ्यांच्या सहभागातून संगणक बनवण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेचा उद्देश विद्यार्थ्यांना संगणकाच्या सुट्या भागांची ओळख व्हावी, त्यांची कार्यप्रणाली समजावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतानाच स्वतः संगणक बनवण्याचे कौशल्य प्राप्त करावे हा आहे.कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठ, कुलगुरू प्रा डॉ डि टी शिर्के, संगणक बांधणी, स्पेशल परपज मशीन, डॉ एस ए शिंदे, प्रा डॉ पी के गायकवाड,

या अनुषंगाने सदर उपक्रम साकारण्यासाठी सुरवातीस इच्छूक विद्यार्थ्यांचा एक गट करण्यात आला. यात बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगच्या तसेच एम एस्सी इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रायोगिक तत्वावर पाच संगणक बनवणेसाठी विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागात एकदिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले. यात विद्यार्थ्यांना संगणकासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुट्या भागांची माहिती देण्यात आली, तसेच संगणक बांधणीचे प्रात्यक्षिक देण्यात आले. विद्यार्थ्यांनी संगणक बांधणी व ऑपरेटिंग सिस्टिम इंस्टॉलेशनच्या प्रात्यक्षिकाचा अनुभव घेतला व अंदाजे दोन तासामध्ये पाच संगणक तयार केले. उपक्रम झाल्यानंतर  स्वतः संगणक बनवण्याचे ज्ञान व कौशल्य  प्राप्त झाल्याने प्रचंड आनंद झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

Advertisement

सदरचे सर्व संगणक हे विद्यापीठाच्या संगणक विभागाकडे कुलगुरू यांच्या हस्ते पुढील कार्यवाही साठी हस्तांतरित करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना ही सुरवात असल्याचे व इथून पुढे असे अनेक संगणक बनवून आपले कौशल्य वाढविण्याचे तसेच स्पेशल परपज मशीन बनवण्याचे आवाहन कुलगुरूंनी केले. सदरच्या उपक्रमासाठी डॉ एस ए शिंदे व डॉ एस बी चव्हाण हे समन्वयक म्हणून काम पहात असून इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग व तंत्रज्ञान अधिविभाग हा उपक्रम संयुक्तपणे राबवत आहेत. याप्रसंगी कुलगुरू प्रा डॉ डि टी शिर्के, प्र कुलगुरू प्रा डॉ पी एस पाटील, कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे, इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे चे अधिविभागप्रमुख प्रा डॉ पी के गायकवाड, तंत्रज्ञान अधिविभागप्रमुख प्रा डॉ एस एन सपली, डॉ एम के भानारकर, डॉ एस एम मस्के  व अन्य शिक्षकेतर कर्मचारी तसेच उपक्रमातील विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page