श्री बंकटस्वामी महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय भूगोल अभ्यासक्रम कार्यशाळा संपन्न
बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, भूगोल विभाग इस्रोचे दुरस्त प्रशिक्षण केंद्र आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सुदूर संवेदन दिन निमित्त नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार गठित भूगोल विषयाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम कार्यशाळा संपन्न झाली. सदर उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ ए आय खान, विद्यापीठातील भूगोल विभाग प्रमुख डॉ मदन सूर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्य आयोजक डॉ विवेक मिरगणे, भूगोल विभाग प्रमुख तथा निमंत्रक डॉ शिवाजी मोरे, सह निमंत्रक डॉ जगन्नाथ चव्हाण इस्रो दुरस्त प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक तथा आयोजन सचिव डॉ प्रकाश कोंका आदी व्यासपीठावर होते.
उद्घाटन प्रसंगी कार्यशाळेचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख तथा निमंत्रक डॉ शिवाजी मोरे यांनी केले. उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉक्टर खान म्हणाले की, नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा कार्यशाळांची आवश्यकता आहे. अध्यक्ष समारोप करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी मध्ये येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकून अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन केले तर अनेक प्रश्न सुटतील असे मत व्यक्त केले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ विकास देशमुख तर प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ मदन सूर्यवंशी होते. डॉ सूर्यवंशी यांनी भारतीय अंतराळ मोहिमेचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या कार्यावर प्रकाश टाकून सुदूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणाली या विषयावर उपस्थित प्राध्यापकांना त्यांना संबोधित केले.
कार्यशाळेच्या द्वितीय सत्रामध्ये अध्यक्ष म्हणून प्रोफेसर डॉ हरिदास पिसाळ हे होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रोफेसर दादासाहेब गजहंस आणि डॉ सचिन मोरे व्यासपीठावर होते. दोन्ही साधन व्यक्तींनी पदवी व पदव्युत्तर भूगोल अभ्यासक्रम यावर सविस्तर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून उपस्थित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रम आणि क्रेडिट व तासिका वर सविस्तर मार्गदर्शन केले.
तृतीय सत्रामध्ये गट चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील गटचर्चा सत्रात व्यासपीठावर भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते. त्यासोबत यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे गटचर्चा समन्वयक यांची निवड करण्यात आली होती त्यामध्ये बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व डॉ बाळासाहेब पोटे, धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व डॉ राघवेंद्र ताटीपामुल, जालना जिल्ह्याचे प्रतिनिधित्व डॉ राजाळे सर तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व डॉ शत्रुघन भोरे यांनी केले. या गट चर्चेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेले अभ्यासक्रम, तासिका, क्रेडिट सिस्टम, प्रॅक्टिकल बॅचेस आणि वर्कलोड यावर भूगोल अभ्यास मंडळ, समन्वयक आणि उपस्थितांमध्ये चर्चा होऊन प्राध्यापकांचे प्रश्न आणि त्यांचे शंकांचे निरसरण करण्यात आले.
कार्यशाळेच्या समारोप समारंभामध्ये अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ ए आय खान, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ मदन सूर्यवंशी डॉ दादासाहेब गजाहंस डॉक्टर शत्रुघ्नभोरे विभाग प्रमुख डॉ शिवाजी मोरे, सह निमंत्रक डॉ जगन्नाथ चव्हाण आधी व्यासपीठावर उपस्थित होते. समारोप प्रसंगी डॉ मदन सूर्यवंशी यांनी सदरील कार्यशाळा आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले सदरच्या कार्यशाळेमधून नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भातील अनेक शंकांचे निरसरण या कार्यशाळेतून झाल्यामुळे अशा कार्यशाळांची आवश्यकता इतर विषयांसाठी देखील आवश्यक असून विद्यापीठाने त्या त्या विषयाचे कार्यशाळा घ्यावे असे मत व्यक्त केले.
समारोप समारंभात मध्ये अध्यक्ष समारोप करत असताना डॉ विवेक मिरगणे यांनी विद्यापीठ प्रशासन आणि अभ्यास मंडळाचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इस्रो दुरस्त प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक तथा आयोजन सचिव डॉ प्रकाश कोंका यांनी केले तर आभार प्रदर्शन भूगोल विभाग प्रमुख डॉ शिवाजी मोरे यांनी केले.
सदरील कार्यशाळेत संपूर्ण विद्यापीठ परिक्षेत्रातील भूगोल विषयाचे प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.