उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नशामुक्त भारत अभियानातंर्गत पथनाट्य आणि सामुहिक प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र प्रशाळेतील रा से यो एकक आणि समाजकार्य विभागाच्या वतीने सोमवार दि १२ ऑगस्ट रोजी नशामुक्त भारत अभियानातंर्गत पथनाट्य आणि सामुहिक प्रतिज्ञा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सामाजिक न्याय विभाग भारत सरकार यांच्या वतीने देशभर नशामुक्त भारत अभियान राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र प्रशाळेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग, चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्राचे संचालक नितीन विसपुते, कलावंत विनोद ढगे, रा से यो कार्यक्रम अधिकारी मनोज इंगोले, डॉ कविता पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. विनोद ढगे आणि त्यांच्या संचाने व्यसनमुक्तीवर पथनाट्य सादर केले. नशामुक्त भारताची प्रतिज्ञा यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. नितीन विसपुते यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ विजय घोरपडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. डॉ मनोज इंगोले यांनी आभार मानले.