उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी गीत गायन व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या वतीने नूतन मराठा शिक्षणशास्त्र विद्यालयात जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुक्रवार दि ९ ऑगस्ट रोजी आदिवासी गीत गायन व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आतंरविद्या शाखा प्रशाळेच्या संचालक तथा शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ मनिषा इंदाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरवासिता दरम्यान झालेल्या या कार्यक्रमास प्राचार्य डॉ एस डी सोनवणे या अध्यक्षस्थानी होत्या. बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मोनिका गावित, वंती धनका, मिना पावरा, योगिता वळवी यांनी आदिवासी बोली भाषेतुन पृथ्वीवंदन गित सादर केले. मोनिका गावित हिने आदिवासी महानायकांबद्दल माहिती दिली.
डॉ एस बी पाटील यांनी आदिवासींच्या संस्कृती,प्रथा व परंपरा याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ एस डी सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणात आदिवासींच्या निसर्ग जीवनाबद्दल माहिती दिली. प्रास्ताविक राहुल शेमले या विद्यार्थ्याने केले. दिपाली पाटील या विद्यार्थिनीने सुत्रसंचालन केले. राहुल सरदार याने आभार मानले. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. डॉ स्वाती तायडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.