मुक्त विद्यापीठात राष्ट्रीय योग परिषद ‘योग दर्शन 2024’चे आयोजन
सहभागी होण्यासाठी विद्यापीठाचे आवाहन
नाशिक : योग संशोधन क्षेत्रात चालना मिळण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने योग परिषदेचे आयोजन करण्यास कोविड काळापासून सुरुवात केली आहे. योग संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन लेख प्रकाशित करणे, तसेच चांगल्या वक्त्यांचे योग विषयक विचार आणि मार्गदर्शन मिळण्याच्या दृष्टीने विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनावणे, प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘योग दर्शन 2024’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन मुक्त विद्यापीठात दि. 23-24 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आले आहे.
यामध्ये भारतभरातून सुमारे 150 योग साधक व अभ्यासक प्रत्यक्ष तसेच आभासी पद्धतीने सहभागी होणार आहेत. या परिषदेत भारतातून योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून बहुमोल मार्गदर्शन करणार आहे. योग शिक्षण व वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, गृहिणी, योग विषयात आवड असणारे नागरिक यात रु. 2000/- नोंदणी शुल्क भरून सहभागी होऊ शकतात. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी पुढील लिंकचा उपयोग करावा.
https://ycmou.digitaluniversity.ac/downloads/Yogdarshan%202024%20Edited%2027-07-24.pdf सदर योग परिषदेत ज्यांना पेपर सादरीकरण करावयाचे आहे, त्याचबरोबर इतरही इच्छुकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुक्त विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ जयदीप निकम यांनी केले.