आदिवासी अकादमी नंदुरबार येथे समाजकार्य विषयाच्या अभ्यासक्रमास कुलगुरु यांच्या उपस्थितीत प्रारंभ
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ च्या अंतर्गत आदिवासी अकादमी नंदुरबार येथे ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समाजकार्य विषयाचा एम एस डब्ल्यु या दोन वर्षीय अभ्यासक्रमास आदिवासी दिनाचे औचित्य कुलगुरु प्रा व्ही एल माहेश्वरी यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
विद्यापीठाअंतर्गत आदिवासी अकादमी नंदुरबार येथे टोकरतलाव शिवारात 25 एकर क्षेत्रात सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी या अकादमीमार्फत भविष्यात आदर्श महाविद्यालय, स्पोर्ट्स अकादमी वसतीगृहे, कौशल्य आधारीत विविध कोर्सेस सुरू करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून वर्ष 2024-25 मध्ये समाजकार्य विभाग या अकादमीमार्फत सुरू करण्यात आला आहे. एकूण 52 विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. क्रांती दिवस व आदिवासी दिनाचे औचित्य साधून या पहिल्या वर्षातील पहिल्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत कुलगुरू यांनी स्वत: उपस्थित राहून केले ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. यानंतर विद्यार्थ्यांच्या वर्गाचे फीत कापून कुलगुरू यांनी उद्घाटन केले.
यावेळी, प्रा एम एस रघुवंशी, व्यवस्थापन परिषद सदस्य, कबाचौउमवि जळगाव, प्रा सचिन नांद्रे, संचालक राष्ट्रीय सेवा योजना, अधिसभा सदस्य अमोल मराठे, के एस विश्वकर्मा, सिलेज प्रकल्प चीफ कोऑर्डीनेटर, प्रा किशोर पवार, संचालक आदिवासी अकादमी नंदुरबार, दहातोंडे, संचालक, कृषी विज्ञान केंद्र, कोळदा, दिपक पटेल प्रकल्प संचालक, आत्मा, एकलव्य प्रशिक्षण केंद्र प्रशासकिय समन्वय प्रा डॉ आर पी पाटील आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा किशोर पवार यांनी नंदुरबार जिल्ह्याची ओळख आदिवासी जिल्हा असली तरी येथील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड विशेषत: समाजकार्य पदवीसाठी शिक्षण घेण्याची आवड मोठ्या प्रमाणात असून समाजकार्य पदवीसाठी विद्यार्थ्यांनी यावर्षी या अकादमीमुळे प्रवेश घेता आला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी, प्रमुख अतिथी प्रा एम एस रघुवंशी यांनी पाण्याचा एक थेंब गरम तव्यावर पडला तर नष्ट होतो पण शिंपल्यात पडला तर त्यचा मोती होतो, म्हणून सर्व विद्यार्थ्यांना आपण काय व्हायचे याबाबत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढण्यासाठी मागदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरू यांनी विद्यापीठ आदिवासी अकादमीमार्फत भविष्यातील राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत माहिती दिली तसेच विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या गरजेप्रमाणे ज्यातून त्यांना रोजगार उपलब्ध होतील अशा विविध डिप्लोमा कोर्सेसवर भर देवून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी विविध पातळीवर नेहमीच मार्गदर्शन करेल व आपण स्वतः ही अकादमीच्या माध्यमातून सतत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच नवीन शैक्षणिक धारेणाबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
यावेळी नंदुरबार येथे आदिवासी अकादमी सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा झाला असल्याचे व शिक्षणातील वाढती स्पर्धा बघता दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अकादमीमुळे उच्च शिक्षणाची संधी मिळाली असल्याबाबत चिन्मय अग्निहोत्री व तुषार वळवी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत गीत साधना पाटील, अंकिता वसावे, क्रिती यांनी म्हटले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकलव्य प्रशिक्षण प्रा स्मिता देशमुख, प्रा हर्षल चौरे, प्रा अर्चना पाटील, योगेंद्र राजपूत, प्रतिभा गांगुर्डे, मनिषा व समाजकार्याच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.