डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह’चे उदघाटन संपन्न
‘सिरम इन्स्टिट्युट’तर्फे नऊ विद्यार्थ्यांची निवड
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलच्या वतीने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीसाठी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी एम एस्सी मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि बायोटेक्नॉलॉजी या विषयाचे ८६ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी सिरमचे एच आर प्रतिनिधी लक्ष्मीकांत खिस्ती, मकरंद पडावे यांनी निवड प्रक्रिया समजावून सांगितली.
८६ पैकी २६ विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड करण्यात आली. व त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखती घेऊन ९ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना क्वालिटी अशुरांस व प्रोडक्शन विभागात घेतले असून प्रत्येकी चार लाखांचे पॅकेज देऊ केले आहे. कोविड लस उत्पादन करणाऱ्या विभागात नौकरीची संधी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपलबद्घ करून देण्यासाठी विद्यापीठातील प्लेसमेंट सेलचे प्लेसमेंट ऑफिसर डॉ गिरीश काळे यांनी परिश्रम घेतले. सिरम इन्स्टिट्यूट तर्फे एच आर विभागातील लक्ष्मीकांत खिस्ती, मकरंद पडवे, दीपक कवडे, तर विद्यापीठातील प्लेसमेंट सेलचे डॉ गिरीश काळे उपस्थित होते.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे –
योगेश चव्हाण
नमोकर मोहाळे
दीपक त्रिभुवन
नकुल जरहड
स्वप्नील सुरडकर
दीपिका दहिवळकर
वैदेही देशमुख
दीक्षा साबळे