भारती विद्यापीठाच्या परिचर्या महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा
प्रसूतीशास्त्र व बाल आरोग्य परिचर्या विभागाच्या वतीने स्तनदा मातांना मार्गदर्शन
पुणे : भारती विद्यापीठाच्या धनकवडी शैक्षणिक संकुलातील परिचर्या महाविद्यालयाच्या स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र परिचर्या व बाल आरोग्य परिचर्या विभागाच्या वतीने १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२४ हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला. “क्लोजिंग द गॅप : ब्रेस्ट फीडिंग सपोर्ट फोर ऑल” या वाक्याला अनुसरून पथनाट्य, कार्यशाळा, भित्तिपत्रे आणि जागतिक पातळीवर परिसंवादाचे आयोजन केले होते.

बिबेवाडी येथे पथनाट्य सादर केले व भारती आयुर्वेदिक रुग्णालयात परिचर्यांसाठी कार्यशाळा आणि परिसंवादाचे आयोजन केले होते. त्यामध्ये आर ए के युनिव्हर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय वक्त्या डॉ स्नेहा पित्रे, यु ए इ जिंन्सी जेकब पीटर ग्रँड रिव्हर हॉस्पिटल किचेनर, ओंटारिओ, भारती हॉस्पिटल रिसर्च सेंटर येथील स्तनपान मार्गदर्शक अर्चना वाडकर यांनी विद्यार्थी आणि परिचारिकांना मार्गदर्शन केले. यामध्ये स्तनपान म्हणजे काय? आईला आणि बाळाला होणारे फायदे, स्तनपान काळातील आईचा आहार, स्तनपानाच्या पद्धती, कांगारू मदर केअर, हिरकणी कक्ष याबाबत माहिती दिली.
या स्तनपान सप्ताहात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ भाग्यश्री जोगदेव व उपप्राचार्य डॉ सुरेश रे यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याचबरोबर स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र परिचर्या व बाल आरोग्य परिचर्या विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.