संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात सेवानिवृत्तीनिमित्त डॉ फुलचंद सलामपुरे यांचा गौरव
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ फुलचंद भगीरथ सलामपुरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. डॉ सलामपुरे हे ३० वर्षांच्या सेवेनंतर ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. यानिमित्ताने प्राचार्य डॉ शिरीष पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी डॉ सलामपुरे व वसंतीबाई सलामपुरे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेचे माजी अध्यक्ष, अधिसभा, व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. तसेच १९८६ मध्ये अखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकाविले होते. गेली ३० वर्षे त्यांनी पंडित नेहरु महाविद्यालय व संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात अध्यापन कार्य केले. यावेळी प्राचार्य शिरीष पवार, उपप्राचार्य रावसाहेब बारोटे, डॉ दिलीप बिरुटे, प्रा शिरीकृष्ण परिहार, प्रा शत्रूघन भोरे, प्रा उल्हास पाटील, कार्यालयीन अधीक्षक साबळे, लक्ष्मण साळोक, प्राचार्य मधुकर चाटसे, डॉ कांबळे दयानंद, प्रा संजय बिरंगणे, अमृत बिराडे, ऍड सारंग देशमुख यांच्यासह संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.