‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दि ०३ ऑगस्ट, रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच दि ३ ऑगस्ट हा दिवस ‘भारतीय अवयवदान दिन साजरा’ करून कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे यांनी उपस्थितांना अवयवदानाच्या प्रतिज्ञेची शपथ दिली.
यावेळी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ एम के पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, गजानन इंगोले, सचिन खडके, जालिंदर गायकवाड, मधुकर आळसे, उद्धव सातपुते, रामदास खोकले, किशोर हंबर्डे, सयद आयुब, बबिता शिंदे, बबन हिंगे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.