सौ के एस के महाविद्यालयात क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी
बीड : सौ के एस के महाविद्यालयात क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर म्हणाले की, क्रांतीसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्य लढयातील स्वातंत्र्य सेनानी समाजकारण आणि राजकारणात त्यांनी सहभाग घेतल्यामुळे तलाठी पदावरून काढण्यात आले. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला.स्वातंत्र्य लढयाबरोबरच बहुजन समाजाच्या विकासामध्ये तसेच अंधश्रध्दा निर्मुलन व अनिष्ठ प्रथा बद्दल त्यांनी जनजागृती केली.
१९२० ते १९४२ मध्ये अनेक वेळा तुरूंगवास भोगावा लागला. १९४२ ते १९४६ या काळात भूमीगत राहून प्रतिसरकार स्थापन केले.बीड मतदार संघातून ते लोकसभेवर निवडूण गेले होते.मराठीतून संसदेत भाषण करणारे ते पहिले मराठी खासदार होते.अशा शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कर्मचारी प्रतिनिधी डॉ बळीराम राख यांनी केले तर आभार डॉ भीमराव राठोड यांनी मानले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, डॉ सुधाकर गुट्टे, डॉ विश्वांभर देशमाने, पदव्युत्तर संचालक डॉ खान अन्सारउल्ला शफी उल्ला, कमवि उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा जालींदर कोळेकर यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .