साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना देवगिरी महाविद्यालयात अभिवादन
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सवात साजरी
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयाच्या साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ अशोक तेजनकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारात अण्णाभाऊ यांनी लेखन केले आहे. शालेय शिक्षण झालेले नसताना देखील साहित्यक्षेत्रातील आपल्या कार्यकर्तृत्वाने ते अजरामर झाले आहेत. सामान्य कुटुंबात जन्माला येऊन त्यांनी केलेला संघर्ष प्रेरणादायी आहे. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाह. त्यांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील सदस्य म्हणून काम करू लागले आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी आपले अनन्यसाधारण योगदान दिले. रशिया आणि अनेक साम्यवादी देशात आण्णाभाऊचे साहित्य पोहचले आहे. मानवतेच्या दृष्टीने या त्यांच्या साहित्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. असे गौरव उद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी याप्रसंगी काढले.
या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ अपर्णा तावरे, डॉ रवी पाटील, डॉ विष्णू पाटील, प्रा नंदकुमार गायकवाड, प्रा सुरेश लिपाने, प्रा पी जे नलावडे, प्रा बाळासाहेब निर्मळ, डॉ शेखर शिरसाठ, डॉ सुलक्षणा जाधव, प्रबंधक डॉ दर्शना गांधी हे उपस्थित होते.