डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पहिल्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमास मान्यता
व्यवस्थापनशास्त्र विभागात ‘बीसीए’ ऑनर्स सुरु
औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पहिल्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमास मान्यता मिळाली आहे. व्यवस्थापनशास्त्र विभागात बी.सी.ए ऑनर्स हा अभ्यासक्रम चालू शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आला आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नवीन शैक्षणिक धोरण-२०२०’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंतर्गत वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली. व्यवस्थापनशास्त्र विभागामार्फत बी.सी.ए (ऑनर्स) हा चार वर्षीय अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरण – २०२० नुसार सुरु करण्यात येत आहे. हा अभ्यासक्रम १२वी कला, वाणिज्य आणि सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तयार केला आहे. सदरील अभ्यासक्रमाला उद्या क्षेत्रामधुन खुप मागणी आहे व हा अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांला प्रोग्रामर, अॅनालिस्ट, डाटा सायंटिस्ट, डाटा अॅनालिस्ट, एआय इंजिनिअर म्हणून काम करण्याची संधी विविध नामवंत आयटी कंपन्यामध्ये मिळणार आहे.
विदर्भ, खान्देश आणि मराठवाडयातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. अभ्यासक्रमाचे सर्व विषय हे नवीन शैक्षणिक धोरण – २०२० नुसार तयार करण्यात आलेले आहेत. अभ्यासक्रमामध्ये बेसीक विषयापासून ते अत्याधुनिक विषय आले आहेत. हा अभ्यासक्रम पुर्णतः पॅक्टिकल ओरिएंटेड बनविण्यात आला आहे. विद्यार्थी व विद्यार्थ्यांना वसतीगृह सुविधा व अत्याधुनिक तांत्रिक ज्ञान मिळवुन देणे हा विद्यापीठाचा उद्देश आहे. या अभ्यासक्रमासाठी ४० जागांना मान्यता देण्यात आलेली आहे. तरी १२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी व्यवस्थापनशास्त्र विभागामध्ये संपर्क करावा , असे आवाहन संचालक डॉ.फारुक खान यांनी केले आहे.
‘हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रने’वर पदविका अभ्यासक्रम
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्याीपीठा व्यवस्थापनशास्त्र विभागामार्फत हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्र पदविका अभ्यासक्रम हा एक वर्षीय पदविका अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासुन सुरु करण्यात येत आहे. वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टरांची व तज्ञ मंडळाची वाढली मागणी लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम व्यवस्थापनशास्त्र विभागात सुरु करण्यात येत आहे. P.G. D.H.A.M. या अभ्यासक्रमाच्या उपयोगितेमुळे वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञ मंडळींना आरोग्य क्षेत्रात व तसेच दवाखान्यात योग्य व्यवस्थापन करण्यास अत्यंत सोयीस्कर व अधिक क्षमतेने करण्यास खुप मदत होईल शकते. तरी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळींनी सदरील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संचालक व्यवस्थापनशास्त्र विभाग संचालक डॉ.फारुक खान यांची संपर्क साधावा.