सोलापूर विद्यापीठात ३ हजार ८७ विद्यार्थ्यांनी दिली पी एचडी पेट-९ ची परीक्षा
सोलापूर विद्यापीठाकडून ऑनलाईन वेबबेस्ड परीक्षा नियोजन यशस्वी
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पी एचडी प्रवेश पूर्व पेट – ९ ची परीक्षा ३ हजार ८७ विद्यार्थ्यांनी दिली. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून प्रथमच ऑनलाइन वेब बेस्ड पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी घरी व आपल्या सोयीच्या ठिकाणी बसून यशस्वीपणे ही परीक्षा दिली. ५७४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेला गैरहजेरी दर्शवली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा यशस्वीपणे पार पडली. मंगळवारी सकाळच्या आणि दुपारच्या अशा दोन सत्रात परीक्षा पार पडली. सकाळच्या क्षेत्रात कॉमन तर दुपारच्या सत्रात संबंधित विषयाची परीक्षा पार पडली. विविध अभ्यासक्रम व विषयांच्या ४७७ जागांसाठी पीएचडी प्रवेश पूर्व पेट-९ ची परीक्षा पार पडली. ४ हजार २०० विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती.
महाराष्ट्रात प्रथमच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पी एचडी प्रवेश पूर्व परीक्षा ही ऑनलाईन वेब बेस्ड प्रणाली द्वारे घेण्यात यशस्वी झाली. संपूर्ण महाराष्ट्र, देश व परदेशातून बसून देखील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रणाली द्वारे ही परीक्षा दिली. त्यामुळे संशोधन करणारे विद्यार्थी व अभ्यासकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे कौतुक केले आहे.
१८० विद्यार्थ्यांवर कारवाई
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा प्रकाश महानवर व प्र-कुलगुरु प्रा लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन वेबसाईट प्रणालीद्वारे यशस्वीपणे पेट-९ ची परीक्षा मंगळवारी घेण्यात आली. ३ हजार ८७ जणांनी ही परीक्षा दिली. ५७४ विद्यार्थी जॉईन झाले नाहीत. तर १८० विद्यार्थ्यांवर गैरप्रकार केल्याने त्यांच्यावर बाहेर पडण्याची कारवाई करण्यात आली. सकाळच्या सत्रात कॉमन पेपरच्या वेळेस काही विद्यार्थ्यांना जॉईन होताना हेल्पलाइन नंबरवरून मदत करण्यात आली. मॉक टेस्ट घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने परीक्षा देता आली.
सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा चांगल्या पद्धतीने पार पडली.