देवगिरी महाविद्यालयात काव्यचर्चा व कवी संमेलनाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : वाचकपीठ देवगिरी महाविद्यालय मराठी विभाग यांच्या वतीने रविवार दिनांक २८/०७/२०२४ रोजी काव्यचर्चा व नंतर कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या समारंभाचे उद्घाटन जेष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ अशोक तेजनकर असतील. पहिल्या सत्रात कवी मंगेश नारायण काळे यांचा बहुचर्चित काव्यसंग्रह ‘शून्य गढ शहर’ यावर चर्चा होईल. या सत्राचे अध्यक्ष डॉ ऋषिकेश कांबळे हे असतील तर वक्ते म्हणून डॉ आशुतोष पाटील (जळगाव), सुचिता खल्लाळ (नांदेड) हे असतील. कवी मंगेश नारायण काळे यांची या सत्रात प्रमुख उपस्थिती असेल.
दुपारच्या सत्रात वाचकपीठ चर्चेतील कवींचे कविसंमेलन रमेश इंगळे उत्रादकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. यात अजीम नवाज राही, प्रतिभा सराफ, आबासाहेब पाटील, पी विठ्ठल, आशा डांगे, वैभव भिवरकर, कविता ननवरे, मनीषा पाटील, अमोल देशमुख, नारायण कुलकर्णी कवठेकर, मारोती सांवत हे कवी सहभागी असतील. या कार्यक्रमासाठी कौतिकराव ठाले पाटील, दादा गोरे, जयदेव डोळे, सतीश बडवे, प्रल्हाद लुलेकर, दासू वैद्य, कुंडलिक अतकरे डॉ विष्णू पाटील यांची विशेष उपस्थिती असेल.
या कार्यक्रमास रसिक, वाचक व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वाचकपीठचे अध्यक्ष प्राचार्य चंद्रकांत भोसले, भास्कर निर्मळ, मराठी विभागाचे प्रमुख डॉ समिता जाधव, डॉ गणेश मोहिते यांनी केले आहे.