‘स्वारातीम’ विद्यापीठ आणि डिस्कव्हरी वेलनेस यांच्यामध्ये सामंजस्य करार
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पुणे येथील डिस्कव्हरी वेलनेस प्रा लिमिटेड यांच्यामध्ये १० जुलै रोजी सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे आणि पुणे येथील डिस्कव्हरी वेलनेस प्रा लिमिटेड च्या डॉ रूपल शहा यांच्या पुढाकाराने या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील नवोपक्रम नवसंशोधन व सहचर्य विभागाने याबाबतीत पुढाकार घेतलेला आहे. पुणे येथील डिस्कव्हरी वेलनेस प्रा लिमिटेड एक अग्रगण्य संस्था आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामध्ये विद्यापीठात सर्टिफिकेट कोर्स इन न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स आणि टेन डे ट्रेनिंग प्रोग्राम इन डाईट अँड डायबिटीज हे दोन कोर्स शिकवले जाणार आहेत. या सर्टिफिकेट कोर्सचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी केले आहे.
यावेळी नवोपक्रम नवसंशोधन साहचर्य विभागाचे संचालक डॉ शैलेश वाढेर, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ डी एम खंदारे, गणितीयशास्त्र संकुलाचे संचालक डॉ डी डी पवार, प्रा एस जी गट्टाणी, प्रा डॉ टी ए कदम, प्रा डॉ योगेश लोलगे, प्रा डॉ निना गोगटे, प्रा डॉ आर व्हि तेहरा व पुणे येथील डिस्कव्हरी वेलनेस प्रा लिमिटेड चे कस्तुरी भोसले, अमोल बागल यांची उपस्थिती होती.