एमजीएम विद्यापीठात कारगिल विजय दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : दिनांक २६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविल्याचा ऐतिहासिक दिवस म्हणून संपूर्ण देशात ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातो. कारगिल विजयास या वर्षी २५ वर्ष पूर्ण होत असून या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एमजीएम विद्यापीठ, एमजीएम स्कूल, मातृभूमी प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, सैनिक वेलफेअर असोसिएशन, प्रादेशिक सेना आणि एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक २६ जुलै २०२४ रोजी एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृह येथे सकाळी १०:३० वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास कारगिल युद्धामध्ये सहभागी असलेले सैनिक, ब्रिगेडियर यु के ओझा, कर्नल निर्देश सहा, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जि प मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना तर एमजीएमकडून कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, एमजीएम स्कूलच्या संचालिका डॉ अपर्णा कक्कड, रणजित कक्कड, मातृभूमी प्रतिष्ठानचे जसवंत सिंग, माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनचे अशोक हांगे व सर्व संबंधित उपस्थित असणार आहेत.
या कार्यक्रमास कारगिल युद्धामध्ये सहभागी झालेले जवान सहभागी होणार असून ते यावेळी उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांना खुला प्रवेश असून नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.