पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त व्याख्यान
औरंगाबाद : येथील पंडित जवाहरलाल नेहरु महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयात व्याख्यानाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या इतिहास विभाग प्रमुख प्रा. सर्जेराव बनसोडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन आणि कार्याबद्दल भाषण केले. त्यांनी सांगितले की अण्णा भाऊ साठे हे एक महान साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि क्रांतिकारक होते. त्यांनी आपल्या लेखन आणि कार्याद्वारे समाजातील गरीब आणि शोषित वर्गांच्या हक्कासाठी लढा दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित नलावडे होते.
त्यांनी अध्यक्षीय समारोपात बोलताना अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास करण्याच्या महत्त्वाबद्दल बोलले. त्यांनी सांगितले की अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून आपण समाजातील वास्तविकतेची ओळख करून घेऊ शकतो आणि त्याच्याशी लढा देऊ शकतो. या कार्यक्रमासाठी प्रमुक उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. आर. मंझा, डॉ. शिवाजी अंभोरे, डॉ. फुलचंद सलामपुरे व महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत जाधव यांनी केले तर अभार प्रा. प्रफुल्ल देवरे यांनी मानले.