एमजीएम विद्यापीठात अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विशेष संवाद सत्राचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम विद्यापीठ, यंग इंडिया, हम, बिल्डिंग भारत, युवा, वायई हेल्थ, कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिना’निमित्त शुक्रवार, दि १९ जुलै २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात ‘अ डायलॉग विथ युवा’ या विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष संवाद सत्रामध्ये कुलगुरू डॉ विलास सपकाळ, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, आयर्न मॅन नितीन घोरपडे, सीए असीम अभ्यंकर, डॉ चिन्मय बाऱ्हाळे, ऍड हरीश अदवंत आदि मान्यवर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमास एमजीएम विद्यापीठाच्या वतीने कुलपती अंकुशराव कदम, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ परमिंदर कौर धिंग्रा, ऋषिकेश गवळी व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित असणार आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागृती करणे आणि तरुण मंडळी, किशोरवयीन मुलांमधील अमली पदार्थांचे व्यसन रोखणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असतो. ड्रग तस्करी रोखण्यासाठीही या मोहीमेला सुरुवात करण्यात आली आहे. आज जगभरामध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनाविरुद्ध जनजागृती होत असून लोकांना होणाऱ्या हानींची जाणीव करून देण्याचे प्रयत्न सर्वत्र चालू आहेत.