डॉ ‘बाआंमवि’ विद्यापीठात ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत एक लाख वृक्षांचे रोपण होणार
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन
चार जिल्ह्यातील २१८ महाविद्यालयात एकाचवेळी कार्यक्रम
३७ स्वयंसेवक लावणार प्रत्येकी तीन झाडे
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. उन्नत भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पॉल हर्बर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग अँड बायोडायव्हर्सिटी स्टडीज’ या विभागात गुरुवारी (दि १८) सकाळी ०९:०० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली या मोहिमेचे उद्घाटन होईल. यावेळी प्र-कुलगुरु डॉ वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांच्यासह सामाजिक वनीकरण विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी कीर्ती जमदाडे, संयोजक डॉ गुलाब खेडकर व डॉ सोनाली क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत.
एक लाख झाडे लावणार
या मोहिमेअंतर्गत विद्यापीठाची संलग्नित २१८ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या वतीने एकाच वेळी वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. एकूण ३७ हजार राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कार्यरत कार्यरत असून प्रत्येक जण तीन झाड लावणार असून त्याची निगा देखील ठेवणार आहे. चार जिल्ह्यात मिळून एकूण एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने रोपे पुरवली आहेत.