डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृति दिन निमित्त व्याख्यान
अण्णाभाऊंच्या साहित्यात मानवी मुल्यांची पेरणी
अभ्यासक डॉ.सोमनाथ कदम यांचे प्रतिपादन
औरन्गाबाद : स्वातंत्र्यपूर्व कालखंडात मराठी ससाहित्यात देव, धर्म, रोमॅन्टिसिझम याचाच अधिक भरणा होता. अशा काळात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी मानवी जीवनमुल्ये, परिवर्तनवादी विचारांची पेरणी केली, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक, इतिहासतज्ज्ञ डॉ.सोमनाथ कदम यांनी केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनातर्पेâ स्मृति दिनानिमित्त मंगळवारी (दि.१८) कार्यक्रम झाला. प्र कुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ अध्यक्षस्थानी होते. यावेळी कुलसचिव डॉ.भगवान साखळे, अध्यासन केंद्र संचालक डॉ.वैशाली बोधेले यांची मंचावर उपस्थिती होती.
महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी कणकवली महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ.सोमनाथ कदम यांचे ‘अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील संवैधानिक मुल्ये’ या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांचे शिक्षण चार भिंतीच्या बंदिस्त शाळेत नव्हे तर खुल्या जीवनाच्या लोकशाळेत झाले. वंचितांच्या व्यथा, वेदना पहिल्यांदा त्यांनी कथा, कादंब-या, लोकनाटय, छक्कड पोवाडयातून मांडल्या. त्यांच्या लेखणावर गौतम बुध्द, कार्ल मार्क्स, लेनिन यांच्यापासूून ते फुले-आंबेडकर यांचा प्रभाव दिसून येतो. गावगाडयातील समाज जीवनाचे वर्णन त्यांच्या साहित्यातून पहिल्यांदाच येत होते. जीवनासाठी लेखन हे त्यांच्या लेखनाचे मुल्ये होते. डॉ.आंबेडकरांनी भारतीय संविधानात स्वातंत्र्य, बंधुता, समता व सामाजिक न्याय ही चतुःसूत्री मांडून समाज परिवर्तन घडविले. अण्णाभाऊ यांच्या साहित्यात याच मुल्यांची जपणुक करण्यात आली होती. अशा या अण्णाभाऊंचा ‘जग बदल घालूनी घाव, मज सांगून गेले भिमराव’ हा संदेश आपण समर्थपणे पुढे न्यावा, असेही डॉ.कदम म्हणाले.
विचारांचा परिघ वाढतोय : प्र कुलगुरु
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी विचाराला वास्तवतेची जोड आणि माणुसकीचा स्पर्श होता. त्यांचे विचार अजरामर राहतील. जात-धर्मात अडकलेल्या बुरसटलेल्या मानसिकतेतून समाज परिवर्तनवादी विचार स्विकारला जातो आहे. एक प्रकारे समजाच्या विचारांचा परिघ वाढतोय, ही सकारात्मक बाब आहे, असे प्रतिपादन प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांनी अध्यक्षीय समारोपात केले. डॉ.वैशाली बोधले यांनी प्रास्ताविक तर ज्योती काळे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. विशाखा शिरवाडकर यांनी सूत्रसंचालन तर डॉ.स्मिता साबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ.चेतना सोनकांबळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.ऋषीकेश कांबळे, नाटयशास्त्र विभागप्रमुख डॉ.स्मिता साबळे, कबिरानंद, अरुण सिंदीकर डॉ.संजय पाईकराव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.