सौ के एस के महाविद्यालयात भारतीय नौदल विभागात नौकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन संपन्न

बीड : एनसीसी बीड सेक्टर च्या वतीने सौ के एस के महाविद्यालयात एनसीसी व करियर मार्गदर्शन समिती अंतर्गत एनसीसी विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदल विभागात नौकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये १४ नौदल अधिकारी, एकूण १०० एनसीसी कॅडेट्स आणि ७ एनसीसी ऑफिसर्स उपस्थित होते. लेफ्टनंट कमांडर मान सर यांनी सर्व कॅडेट्सना प्रेरित केले आणि नौदल सेवेबाबत त्यांच्याशी संवाद साधला.

भारतीय नौदल विभाग शाळा, तांत्रिक महाविद्यालये आणि नागरी लोकसंख्येच्या विद्यार्थ्यांशी संलग्न होऊन भारतीय नौदलाच्या विविध भूमिका आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी अनेक कार्यक्रम आणि उपक्रम राबवते. महाराष्ट्राच्या उत्तर-मध्य-दक्षिण भागातील किनारपट्टीच्या जिल्ह्यांसह आणि अंतराळात पोहोचण्यासाठी मेसर्स टोयोटा (इंडियन लि) च्या संयुक्त विद्यमाने ०८ जुलै २४ पासून २५ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या ३२ जिल्ह्यांचा महा-कनेक्ट कार ड्राइव्हचा समावेश आहे. शहरे आणि तीन रेडियलसह सुमारे ४२१० किमी (संचयी) अंतरप्रवास करणार आहेत.

Advertisement

या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना भारतीय नौदल सेनाच्या गौरव शाली इतिहास व कार्याबद्दल परिचित करण्यात आले. या बरोबरच याअभियानाद्वारे एनसीसी कॅडेटसनां नौदल सेवेत कोण कोणत्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन कमांडर बलकार सिंग यांनी केले. सौ के एस के महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांनी नौदलच्या सर्व टीमला शुभेच्छा दिल्या. एनसीसी विभाग महाविद्यालयात सदैव चांगले कार्य करत असते, यापुढेही असेच करिअर मार्गदर्शन समिती व एनसीसी विभागाद्वारे चांगल्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त करून एनसीसी विद्यार्थ्यांनाही त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळंणकर, उप-प्राचार्य डॉ नारायण काकडे, पी जी डायरेक्टर डॉ अन्सार खान, सुपरवायझर जालिंदर कोळेकर, करिअर मार्गदर्शन समिती प्रमुख डॉ इरलापल्ले मॅडम ,कार्यालय अधीक्षक डॉ विश्वंभर देशमाने डॉ सुधाकर गुट्टे,एनसीसी बीड सेक्टर चे प्रमुख कॅप्टन डॉ बी टी पोटे, कॅप्टन डॉ सुनीता भोसले, लेफ्टनंट डाॅ शैलेश अकुलवार, लेफ्टनंट डाॅ जगन्नाथ चव्हाण, सेकंड ऑफिसर प्रदीप राठोड थर्ड ऑफिसर नितीन जाधव, थर्ड ऑफिसर विकास झुंजुर्के यासोबत एनसीसी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page