उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्ररी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, अॅङ अमोल पाटील, नितीन झाल्टे, कुलसचिव डॉ विनोद पाटील, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील हे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांनी ऑनलाईन काम ही काळाची गरज गरज असून कमी कालावधीत विद्यार्थी विकासाच्या योजना पोहचविण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होईल असा विश्वास व्यक्त केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एज्युटेक फाउंडेशनच्या वतीने हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. या विद्यापीठाचे प्रा नितीन पाटील, दीपक हर्डीकर यावेळी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. तीनही जिल्ह्यातील १७९ अधिकारी व प्राचार्य उपस्थिती होते. विद्यार्थी विकास संचालक डॉ जयेंद्र लेकुरवाळे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. राजेश बघे, मच्छिंद्र पाटील, जगदीश शिवदे , अनुराग महाजन, चंदन मोरे व कृष्णा लांडगे यांनी या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.