अमरावती विद्यापीठात एम एस्सी बायोटेक्नॉलॉजी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील एम एस्सी बायोटेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, शैक्षणिक सत्र २०२४-२५ करीता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी प्रवेशपूर्व परीक्षा विद्यापीठाच्यावतीने दि २६ जुलै, २०२४ रोजी आयोजित केली आहे. या प्रवेशपूर्व परीक्षेकरीता आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम तारीख २२ जुलै, २०२४ आहे. परीक्षेचा निकाल ३० जुलै, २०२४ रोजी घोषित होईल.
जे विद्यार्थी परीक्षेस बसतील त्यांचे परीक्षा क्रमांक व बॅच याबाबतची माहिती त्यांना एस एम एस आणि ई-मेलवर २३ जुलै, २०२४ पर्यंत पाठविण्यात येणार आहे.
आवेदनपत्र भरण्याकरीता
आवेदनपत्र इच्छूक विद्यार्थ्यांना https://sites.google.com/sgbau.ac.in/biotechnologyentrance2024/home या वेबसाईटवर भरावयाचे आहे. त्याकरीता रू ७५०/- खुल्या प्रवर्गाकरीता व रू ५००/- राखीव प्रवर्गाकरीता शुल्क निश्चित करण्यात आले आहे. परीक्षा ही विद्यापीठ परिसरामध्ये होईल.
विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी विभागातील आजवर अऩेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून देश-विदेशातील नामांकीत कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. या विभागाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी दरवर्षी प्रचंड गर्दी करतात. विभागामध्ये असलेले तज्ज्ञ शिक्षक, झालेले संशोधन, संशोधन प्रकल्प, पेटेंट्स, त्यामुळे या विभागातील विद्यार्थी सर्वंकष तयार होतो.
ज्या विद्यार्थ्यांना आवेदनपत्र सादर करावयाचे आहे, त्यांनी बायोटेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ प्रसाद वाडेगावकर यांना कार्यालयीन वेळेत तसेच मो. क्रमांक ९४२२१५७२६३ यावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.