संंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विविध पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमांची सत्र २०२४ -२५ साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यातील मानवविज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत येणाऱ्या मराठी, अनुवाद हिंदी, समाजशास्त्र, इंग्रजी, डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा, पाली आणि बुद्धिझम, मानसशास्त्र, संस्कृत, प्रादर्शिक कला तसेच आंतरविद्याशाखेच्या जेंडर अॅड वुमेन्स स्टडी या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया यावर्षीपासून त्या त्या विभागाच्या स्तरावर करण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अनुषंगाने मागील शैक्षणिक सत्रापासून वरील सर्व अभ्यासक्रमांची सुरुवात झाली आहे. या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना http://admission.sgbau.ac.in या संकेतस्थळावरील केंद्रीकृत पीजी प्रवेश २०२४-२५ ( Centralised PG Admission ) या स्थानावर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येईल. प्रवेश अर्ज भरून त्याची प्रत संबंधित विभागात आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या मूळ व छायांकित प्रतींसह विहित मुदतीच्या आत सादर करावयाचे आहे. प्रवेश प्रक्रियेविषयीचे वेळापत्रक संकेतस्थळावर दिलेले आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ मोना चिमोटे तसेच आंतरविद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ वैशाली गुडधे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी त्या त्या संबंधित विभागांचे विभागप्रमुख/ समन्वयक यांचेशी प्रत्यक्ष संपर्क साधावा.