उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम एस डब्ल्यु प्रथम वर्षाची केंद्रीय पध्दतीने ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि संलग्नीत समाजकार्य महाविद्यालयांमधून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता एम एस डब्ल्यु प्रथम वर्षाची केंद्रीय पध्दतीने ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून प्रवेश प्रकियेसाठी १६ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २१ जुलै रोजी सामायिक प्रवेश परीक्षा होणार आहे.
एम एस डब्ल्यू चे सात ठिकाणी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
१) लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव
२) भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा
३) श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीचे पंडीत जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर
४) डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे
५) महात्मा फुले एम एस डब्ल्यु व मातोश्री झ मो तुर्खिया बी एस डब्ल्यु महाविद्यालय, तळोदा
६) स्कूल ऑफ सोशल सायन्सेस, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
७) विद्यापीठ संचलित आदिवासी अकादमी, नंदुरबार याठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. काही विद्यार्थ्यांचे पदवी परीक्षांचे रिड्रेसलचे निकाल जाहीर होत असल्याने विद्यार्थीहित लक्षात घेवून प्रवेशासाठी ९ जुलै ऐवजी १६ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (www.nmu.ac.in) भेट देवून १६ जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत. १८ जुलैच्या दुपारपर्यंत स्वीकृतीकेंद्रावर ऑनलाईन अर्जांची प्रिंट काढून जमा करावी. याच दिवशी पात्र विद्यार्थ्यांची तात्पुरती यादी विद्यापीठाचे संकेतस्थळ तसेच संबंधित महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर जाहीर होईल. १९ जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवता येतील. २० जुलै रोजी पात्र उमेदवारांची अंतीम यादी जाहीर होईल त्याच दिवशी सामायिक प्रवेशासाठी ऑनलाईन हॉलतिकीट विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
२१ जुलै रोजी स ११:०० ते १२:०० या वेळेत सामायिक प्रवेश परीक्षा होणार आहे. २५ जुलै रोजी या प्रवेश परीक्षेचा निकाल व अंतीम गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर कॅप राऊंड होणार असून त्या संदर्भात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली. अशी माहिती एम एस डब्ल्यू केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे कार्याध्यक्ष प्रा किशोर पवार यांनी दिली.