संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे पर्यावरण पुरस्कारासाठी नामांकन अर्ज आमंत्रित

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे दरवर्षी वृक्षरोपण व वृक्षसंवर्धन, जलव्यवस्थापन, जलसंवर्धन, जैवविविधता संवर्धन, अपारंपारिक उर्जा रुाोताचा वापर, जनजागृती व पर्यावरण संवर्धन आदी क्षेत्रात पर्यावरणपूरक उत्कृष्ट कार्य करणा­या विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालये, शाळा व सामाजिक भावनेतून पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणारे सक्षम प्राधिकारणांकडे नोंदणीकृत विविध प्रतिष्ठान आणि स्वयंसेवी संस्था (गट अ) व व्यक्ती (गट ब) यांना पर्यावरण पुरस्कार प्रदान केल्या जातो.

Sant Gadge Baba Amravati University, SGBAU

आजवर अनेक संस्था व व्यक्तींना हा पुरस्कार देवून गौरविले आहे. यावर्षी हा पुरस्कार राष्ट्रीय प्रदुषण नियंत्रण दिनानिमित्ताने दि ०२ डिसेंबर, २०२४ रोजी ससन्मान प्रदान करण्यात येईल. संस्थागटात रू १५,०००/- रोख, तर व्यक्तीगटात रू १०,०००/- रोख, याशिवाय गौरव प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

Advertisement

सन २०२४ चा पर्यावरण पुरस्कार प्राप्त करण्यास इच्छूक व्यक्ती/ संस्थांसाठी सविस्तर माहिती व आवेदनपत्र विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर ‘अवार्ड अॅन्ड अचिव्हमेन्ट’ येथे उपलब्ध आहे. तरी इच्छुकांनी दि ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत विहीत प्रपत्रातील नामांकन आवेदनपत्र हार्डकॉपी (५ प्रतीत) विद्यापीठात सादर करावे, अशा सूचना विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ अविनाश असनारे यांनी केल्या आहेत. अधिक माहितीकरीता संबंधितांनी विद्यापीठ उद्यान अधीक्षक अनिल घोम यांना प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्र 9922911101 यावर संपर्क साधावा, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page