भारती विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवावे – डॉ विवेक सावजी
पुणे : नव्या युगातील बदलत्या गरजा भागवण्यासाठी व भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवावे असे मत भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ विवेक सावजी यांनी व्यक्त केले. भारती विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये “रिसेन्ट ट्रेंड्स इन सायन्स, टेकनॉलॉजी ऍण्ड मॅनेजमेंट” या विषयावर दोन दिवसीय आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ सावजी यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते.
प्रसंगी डी टी ई चे संचालक डॉ डी व्ही जाधव, सहकार्यवाह डॉ एम एस सगरे, भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कुल ऑफ एक्सलन्सच्या अध्यक्षा स्वप्नाली विश्वजीत कदम, प्राचार्य डॉ प्रदीप जाधव उपस्थित होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पराग काळकर यांनी ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
डॉ सावजी पुढे म्हणाले, अशा प्रकारच्या परिषदांमुळे शैक्षणिक विचारमंथन घडून येऊन त्यामुळे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्या कल्पकतेला वाव मिळतो. त्यामुळे ही परिषद उपयुक्त ठरणारी आहे.
या परिषदेमध्ये ह्यमनु सटेंर्ड टेक्नॉलॉजी – अँप्रोच फॉर सस्टेनेबल अडव्हान्समेंट्स ऍण्ड टेक्नॉलॉजि (USA), नॅनो टेक्नॉलॉजी -एक्सफ्लोरिगं नॅनो मटेरियल्स, बायो मटेरियल्स ऍण्ड सेफ्टी. (USA), रिव्होल्यशनायु झिगं द डेंटल सेक्टर विथ इनोव्हेटिव्ह ऍण्ड कॉस्ट इफेक्टिव्ह डिजिटल डेंचेर सोल्यशनु (UK) अशा तीन विषयांवर तज्ञांची व्याख्याने झाली.
परिषदेत एकूण ‘आधनिुक तंत्रज्ञान’ विषयावर १५२ शोधनिबंध सादर केले. त्यातील १२ शोधनिबंध युएसए, तुर्की, इंडोनेशिया, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपिन्स, नायझेरिया आणि आर्मेनिया इ देशातील होते. प्राचार्य डॉ प्रदीप जाधव यांनी महाविद्यालयाचा संक्षिप्त अहवाल सादर केला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रा सुचिता खोत यांनी प्रास्ताविक केले तर डॉ विजया पवार यांनी आभार मानले.