उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायनशास्त्र प्रशाळेत पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायनशास्त्र प्रशाळेत सहा विषयांच्या पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून रोजगाराभिमूख असे हे अभ्यासक्रम गेल्या काही वर्षापासून सुरु आहेत.
१९९२ मध्ये रसायनशास्त्र प्रशाळेला सुरुवात झाली. पॉलीमर केमिस्ट्री, पेस्टीसाईड अॅण्ड अग्रो केमिकल्स, इंडस्ट्रीयल केमिस्ट्री, ऑरगॅनिक केमिस्ट्री, फिजीकल केमिस्ट्री आणि अॅनालिटीकल केमिस्ट्री असे एकूण सहा एम.एस्सी. अभ्यासक्रम सुरु आहेत. या प्रशाळेत २००९ पासून सीबीसीएस पॅटर्न लागू आहे. गत वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि सीजीपीए प्रणाली स्विकारली आहे. या अभ्यासक्रमांसाठी औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ, विषयातील तज्ज्ञ आणि माजी विद्यार्थी यांचा अभिप्राय घेण्यात येतो.
विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा यासाठी विद्यापीठाच्या सीटीपीसी मार्फत परिसर मुलाखतींचे आयोजन केले जाते. या प्रशाळेतील विद्यार्थ्यांना नामांकित उद्योग संस्था, शैक्षणिक संस्था यामध्ये रोजगार संशोधनाची संधी मिळते. बरेच विद्यार्थी स्वत:चे व्यवसाय सुरु करतात. नियमित तासिका, प्रात्यक्षिके, संशेाधन प्रकल्प, औद्योगिक भेटी, इंडस्ट्रीयल ट्रेनिंग आणि ऑनजॉब ट्रेनिंग याचे काटेकोर पालन केले जाते. तरी बी एस्सी उत्तीण विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट देवून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करावी असे आवाहन प्रशाळेचे संचालक प्रा डी एच मोरे यांनी केले आहे.