देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : दि ६ जुलै २०२४ शनिवार रोजी दुपारी ०२:०० वा महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ११ वी विज्ञान वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थी व पालकांना संबंधित दोन वर्षात महाविद्यालयात होणारे उपक्रम व त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा म्हणून राबविले जाणारे विविध उपक्रम तसेच विषयनिहाय शिक्षकांची ओळख, भेट व सहशालेय इतर उपयुक्त कार्यक्रम यांची माहिती विद्यार्थी व पालकांना व्हावी, शिक्षक व पालक यांच्यामध्ये दुवा साधला जावा, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाकरिता शिक्षक-पालक यांच्यामध्ये सुसंवाद घडावा, विचारांची देवाण-घेवाण व्हावी, पालकांच्या महाविद्यालय व शिक्षकाच्या प्रती असलेल्या अपेक्षा लक्षात याव्यात व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेली ग्रंथालय, क्रीडांगण या सुविधांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने पालक मेळाव्याचे आयोजन केले आहे.
तरी जास्तीत जास्त पालकांनी पालक मेळाव्याला हजर राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य प्रा एन जी गायकवाड, पर्यवेक्षक प्रा अरुण काटे, पर्यवेक्षक डॉ किरण पतंगे, पर्यवेक्षक डॉ सीमा पाटील यांनी केले आहे.